कौटुंबिक जबाबदारी असणारी व्यक्ती, जेव्हा कुटुंबातील अनेक लोक तिच्यावर अवलंबून असतात. जबाबदारीची अशी अनेक बंधने असताना, या बंधनमुक्त होणे शक्य आहे का? या लेखात, सद्गुरु याचा सुंदर खुलासा करत आहेत.

सद्गगुरु: तुम्ही कदाचित या बंधनांमधून शारीरिक दृष्ट्या मुक्त होऊ शकत नसाल, परंतु तुमचे मन मात्र या बंधनांमधून नक्कीच मुक्त करू शकता. ते तुमच्याच हातात आहे, नाही का? कदाचित या क्षणी तुम्ही संन्यास घेऊन आश्रमात जाऊ शकत नसाल – तुमचा पती, तुमची पत्नी
किंवा मुलं तुम्हाला तशी परवानगी देणार नाहीत, परंतु मानसिक दृष्ट्या बंधमुक्त होण्यासाठी तुम्हाला कोणी अडवले आहे का? नाही. ही बंधने फक्त तुम्हीच निर्माण केलेली आहेत, इतरांनी नाही. मुक्त असणे याचा अर्थ तुम्ही सर्व परिस्थितींमध्ये बदल घडवणे असा नाही. बंधमुक्त होण्यासाठी तुम्ही तुमचे जीवन किंवा सभोवतालची कोणतीही परिस्थिती बदलण्याची काहीही आवश्यकता नाही. कारण एखादी परिस्थिती इतर कोणत्याही परिस्थितीपेक्षा अधिक चांगली असू शकते, यावर कधीही विश्वास ठेऊ नका. तो फक्त एक पर्याय असू असतो. काही लोक आहे त्या परिस्थितीत जगणे स्वीकारतात तर काही लोक इतर कोणीतरी आणखी एखाद्या वेगळ्या परिस्थितीत जगण्याचं स्वीकारतात; प्रत्येक गोष्टीचे काही फायदे आणि तोटे आहेत. बाहेरील परिस्थिती कशीही असली तरी तुमच्या आत तुम्ही कसे आहात हे महत्वाचे आहे, नाही का? कदाचित बाह्य परिस्थितीत तुम्ही तातडीने बदल करू शकणार नाही, कदाचित त्यात काही गैर नसेल सुद्धा आणि त्यामुळे त्यात बदल करण्याची काही आवश्यकता सुद्धा नसेल. परंतु तुम्ही तुमची आंतरिक स्थिती मात्र बदलली पाहिजे कारण तुम्हाला ती त्रासदायक ठरते आहे.

तुम्ही आतून कसे आहात हे फार महत्वाचे आहे.

तुमचे मन दिव्यत्वाकडे जाण्याची एक शिडी बनु शकते, ते तुम्हाला  उत्साही करू शकते. तुमच्या मनाने तुम्हाला अनेकदा खूषही  केलेले  आहे, नाही का? आणि अनेकदा त्याने तुम्हाला अतिशय दुःखी, भयभीत, तणावग्रस्त आणि निराश सुद्धा केलेले  आहे. म्हणजे एकच मन दोन्ही गोष्टी करत असते. त्याला जे पाहिजे तसे ते करत असते; कारण या मनावर तुमचा ताबा नाही, ते तुमच्या नियंत्रणाबाहेर गेले आहे. तुम्ही  तुमची कार घेऊन दुसर्‍या शहरात पोहोचू शकता किंवा ती सरळ एखाद्या झाडावर आदळू शकता. ते तुमच्या  हातात आहे. म्हणून तुम्ही तुमच्या मनाचा वापर कसा करता यावर सर्व अवलंबून आहे. जर नियंत्रण तुमच्या हाती असेल तर तुम्ही खूप दूरची मजल मारू शकता .