उपवासाचे काही फायदे आहेत का?

सद्गुरु आपल्याला उपवासाचे फायदे समजावून सांगत आहेत.
is-there-any-benefit-to-fasting-empyt-plate
 

सद्गुरु: आपल्याला बळजबरीने उपास करायला न लागणे महत्वाचे आहे. आपण जर शरीराच्या नैसर्गिक चक्राकडे
लक्ष देऊन पाहिले, तर त्यामध्ये मंडला म्हणून एक चक्र असते. मंडल म्हणजे प्रत्येक 40 ते 48 दिवसांनी आपली शरीर प्रणाली एका विशिष्ट चक्रातून जाते. प्रत्येक चक्रात तीन दिवस असे असतात जेंव्हा आपल्या शरीराला अन्नाची आवश्यकता नसते. आपले शरीर कसे कार्यरत आहे याविषयी आपण जर जागरूक असाल, तर आपल्या असे लक्षात येईल की या दिवसांमध्ये आपल्या शरीराला अन्नाची आवश्यकता भासत नाही. आणि कोणताही त्रास न होता, या दिवशी आपण अन्नसेवन न करता राहू शकता.

आपण जर सतत चहा किंवा कॉफी घेत असाल, आणि जर आपण उपवास केलात, तर तुमच्यासाठी ते अतिशय त्रासदायक होईल; उपवास करणे अतिशय कठीण होईल. म्हणून आपल्याला जर उपवास करायचा असेल, तर प्रथम योग्य प्रकारचा आहार घेऊन आपले शरीर उपवासासाठी तयार करा.

Embed this infographic

प्रत्येक 11 ते 14 दिवसांनी एकदा तुम्हाला काहीही खाण्याची इच्छा होणार नाही. त्या दिवशी आपण काहीही खाऊ नये. ही जाणीव कुत्रे आणि मांजरांमध्ये सुद्धा असते याची आपल्याला कल्पना आहे का? एखाद्या विशिष्ट दिवशी ते काहीही खात नाहीत हे आपल्या कधी लक्षात आले आहे का? त्यांना त्यांच्या शरीराची जाण असते. ज्या दिवशी शरीर सांगते, “अन्न नको”, म्हणजे तो स्वच्छतेचा दिवस आहे, त्या दिवशी ते काहीही खात नाहीत. तुमच्यामध्ये ही जाण नसल्यामुळे एकादशी म्हणजे उपवासाचा दिवस ठरविला गेला. चंद्र दिनदर्शिकेनुसार प्रत्येक 14 दिवसांनंतर एकादशी येते. 14 दिवसांमध्ये किमान एक वेळा तरी तुम्ही अन्नग्रहण थांबवू शकता. आपल्याला जर अन्नग्रहण केल्यावाचून राहता येत नसेल, किंवा तुमची दिनाचर्या कठीण परिश्रमांची असेल, आणि उपवास सहन करण्यायेवढी आवश्यक अशी साधनेची बळकटी नसेल, तर आपण फळे खाऊन उपवास करू शकता. फक्त तुमच्या शरीर यंत्रणेचे बारकाईने निरीक्षण करा आणि तुमच्या असे लक्षात येईल, की काही ठराविक दिवशी, तुम्हाला काहीही खाण्याची गरज भासत नाही. त्या दिवशी बळजबरीने अन्नग्रहण करणे ही चांगली गोष्ट नव्हे.

तुम्ही तुमचे शरीर आणि मन यांची पुरेशी तयारी केल्याशिवाय जर बळजबरीने उपवास केला, तर त्यामुळे तुमच्या आरोग्याचे नुकसानच होईल.

समजा एखाद्या व्यक्तीला काही निश्चित काळासाठी उपवास करायचा आहे, तर त्याला योग्य प्रकारच्या आध्यात्मिक प्रक्रिया किंवा साधना यांची जोड देणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचे शरीर आणि मन यांना पुरेसे तयार न करता, जर बळजबरीने उपवास केला, तर त्यामुळे तुमच्या आरोग्याचे नुकसानच होईल. परंतु जर तुमचे शरीर त्यासाठी योग्य प्रकारे तयार केलेले असेल, आणि तुमचे मन एका खास अवस्थेत असेल, तुम्ही जर तुमची ऊर्जा उत्तमरित्या सक्रीय ठेवली असेल, तर उपवासाचे अनेक फायदे होतील.

तुम्ही जर सतत चहा किंवा कॉफी घेत असाल, आणि जर तुम्ही उपवास केलात, तर तुमच्यासाठी ते अतिशय त्रासदायक होईल; उपवास करणे अतिशय कठीण होईल. म्हणून आपल्याला जर उपवास करायचा असेल, तर प्रथम योग्य प्रकारचा आहार घेऊन आपले शरीर उपवासासाठी तयार करा. तुम्ही खाण्याची इच्छा रोखून धरणे तुमच्यासाठी अत्यंत त्रासदायक होत असेल, तर त्यामुळे तुम्ही तुमच्या शरीराचे केवळ नुकसानच करून घ्याल. कदाचित तुम्हाला एखादी सिद्धी करून दाखवायची असेल, “मी तीन दिवस काहीही खाल्ले नाही.” आणि सार्‍या जगाला हे ओरडून सांगायचे असेल, तर कृपया तसे काही करू नका. त्याचा आपल्याला काहीही उपयोग होणार नाही. तुम्ही फक्त तुम्हाला अशक्त बनवाल, येवढेच. आपले शरीर जाणून घेणे आणि आपल्या शरीर यंत्रणा कशी काम करते, आणि आपल्यासाठी सर्वोत्तम काय आहे याची सखोल जाणीव करून घेणे हे अशा गोष्टी करण्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे.

प्रत्येक व्यक्तीसाठी उपवास करणे चांगलेच असेल असे नाही, परंतु यामागची योग्य, सखोल जाणीव करून घेऊन उपवास केले तर त्याचे अनेक फायदे आहेत. म्हणून आपल्या शरीर यंत्रणेसाठी योग्य आणि सुसंगत पद्धत काय आहे हे शोधणे आणि त्यानुसार उपवास करणे
उत्तम.