सद्गुरु दीपोत्सवाच्या - दिवाळीच्या महोत्सवाचे महत्त्व आणि आपण हा एक जबरदस्त काळ कसा बनवू शकतो हे सांगतात!

सद्गुरु: दिवाळी विविध सांस्कृतिक कारणांसाठी साजरी केली जाते परंतु ऐतिहासिकदृष्ट्या त्याला नरक चतुर्दशी असे म्हणतात कारण नरकासूर हा अत्यंत क्रूर राजा होता आणि त्याला कृष्णाने ठार मारले होते. त्या कारणास्तव, हा उत्सव इतक्या मोठ्या प्रमाणात झाला. हा उत्सव बर्‍याच वेगवेगळ्या मार्गांनी शुभ आहे. या दिवशी असे म्हणतात की एखाद्याला पैशांची गरज असेल तर लक्ष्मी येईल. एखाद्याला आरोग्य हवे असेल तर शक्ती येईल. एखाद्याला शिक्षण हवे असेल तर सरस्वती येईल. कल्याण साधेल असे सांगण्याचे हे सर्व बोलीभाषेतील मार्ग आहेत.

आतील प्रकाश तयार करणे

दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. दिवाळीच्या वेळी, प्रत्येक शहर आणि गाव हजारो दिव्यांनी उजळून निघालेले दिसेल. परंतु हा उत्सव फक्त बाहेरील दिवे लावण्याबद्दल नाही - अंतर्गत प्रकाश येणे आवश्यक आहे. प्रकाश म्हणजे स्पष्टता. स्पष्टतेशिवाय, तुमच्याकडे असलेला इतर प्रत्येक गुण केवळ हानिकारक ठरेल, लाभदायक नाही, कारण स्पष्टतेशिवाय आत्मविश्वास एक आपत्ती आहे. आणि आज, जगात बरीच कार्य स्पष्टतेशिवाय केली जाते.

जर आपण सहजपणे बसलो तर आपली जीवन ऊर्जा, हृदय, मन आणि शरीर जिवंत फटाक्यासारखे पेटलेले पाहिजे. जर तुम्ही मंद, मरगळलेले असाल तर तुम्हाला दररोज बाहेरून फटाक्यांची आवश्यकता आहे.

एक दिवस, एक नवशिक्या पोलिस त्याच्या अनुभवी जोडीदारासह प्रथमच गावातून गाडी चालवत होता. त्यांना रेडिओवर एक संदेश मिळाला ज्यामध्ये असे सांगितले की लोकांचा एक गट एका विशिष्ट रस्त्यावर घुटमळत आहे आणि त्यांना त्या लोकांना पांगवण्यासाठी सांगितले होते. ते रस्त्यावर गेले आणि एका कोपऱ्यावर उभे असलेले लोक त्यांना दिसले. गाडी जवळ येताच नवीन पोलिसाने मोठ्या उत्साहाने आपली खिडकी खाली घेतली आणि म्हणाला, “ओ, तुम्ही, त्या कोपऱ्यातून बाजूला व्हा!” लोकांनी गोंधळाने एकमेकांकडे पाहिले. मग तो मोठ्याने ओरडला, “तूम्हाला माझं ऐकू येत नाही का? मी तुम्हाला सांगितले की त्या कोपऱ्यातून बाजूला व्हा! ” ते सर्व पांगले. मग, स्वतःच्या पहिल्या अधीकृत कामगिरीचा लोकांवर झालेला परिणाम पाहून खुश झाल्यावर, त्याने आपल्या अनुभवी जोडीदाराकडे पाहिले आणि विचारले, “मी चांगले केले का?” त्याचा जोडीदार म्हणाला, “तो बस स्टॉप आहे हे लक्षात घेतले तर काहीही वाईट नाही.”

आवश्यक स्पष्टतेशिवाय तुम्ही जे काही करण्याचा प्रयत्न करता ते आपत्तीजनक ठरेल. प्रकाश तुमच्या दृष्टीत स्पष्टता आणतो, हे केवळ शारीरिक स्तरावर नाही. तुम्ही आयुष्य किती स्पष्टपणे पाहता आणि तुमच्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीचे आकलन कसे करता हे ठरवते की तुम्ही तुमचे जीवन किती शहाणपणाने जगत आहात. दिवाळीचा दिवस म्हणजे जेव्हा काळया शक्तींना ठार मारण्यात आले आणि प्रकाश पडला. मानवी जीवनाची देखील ही दुर्दैवी परिस्थिती आहे. ज्याप्रमाणे आपणच सूर्याला आडकाठी करत आहोत हे वातावरणातल्या काळया ढगांना लक्षात येत नाही त्याचं प्रमाणे माणसाला कुठूनही प्रकाश आणण्याची गरज नाही. जर त्याने फक्त स्वत: मधे जमा होऊ दिलेले काळे ढग बाजूला केले तर प्रकाश येईल. दिव्यांचा सण फक्त त्या गोष्टीची एक आठवण आहे.

जीवन एक उत्सव

भारतीय संस्कृतीत असा एक काळ असा होता की वर्षाचा प्रत्येक दिवस हा सण असायचा - वर्षात 365 सण. यामागील कल्पना अशी होती की आपले संपूर्ण आयुष्य एक उत्सव बनवा. आज कदाचित तीस किंवा चाळीस उत्सव शिल्लक आहेत. आपल्याला दररोज ऑफिसमध्ये जायला लागते किंवा काहीतरी वेगळे करावे लागते म्हणून आता आपण ते देखील साजरे करू शकत नाही. तर लोक साधारणत: दरवर्षी केवळ आठ किंवा दहा उत्सव साजरे करतात. जर आपण हे असेच सोडले तर पुढच्या पिढीला कोणताही उत्सव राहणार नाही. त्यांना उत्सव म्हणजे काय हे कळणारच नाही. ते फक्त कमावतील आणि खातील, कमावतील आणि खातील- ते फक्त हेच करत राहतील. हे आधीपासूनच बर्‍याच लोकांच्या बाबतीत असेच झाले आहे. उत्सव म्हणजे ते तुम्हाला सुट्टी देतात आणि मग तुम्ही दुपारनंतर उठता. मग फक्त जास्त खाता, पिक्चरला जाता किंवा घरी टीव्ही पाहता. आणि जर काही उत्तेजक बाहेरून घेतले तरच हे लोक थोडे नाचतात. नाहीतर ते गात किंवा नाचत नाहीत. पूर्वी असे नव्हते. उत्सवाचा अर्थ असा होता की संपूर्ण गाव एका ठिकाणी एकत्र यायचं आणि तेथे मोठा उत्सव व्हायचा. उत्सवाचा अर्थ असा होता की आम्ही पहाटे चार वाजता उठायचो आणि अतिशय सक्रियपणे, बरेच काही घरात घडायचे. लोकांमध्ये ही संस्कृती परत आणण्यासाठी ईशा चार महत्त्वाचे सण साजरे करतात: पोंगल किंवा मकर संक्रांती, महाशिवरात्रि, दसरा आणि दिवाळी.

गंभीर नाही परंतु पूर्णपणे सामील

जर तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे उत्सवाच्या दृष्टीने बघितले तर तुम्ही जीवनाबद्दल गंभीर न राहता पूर्णपणे त्यात गुंतणे शिकता. आत्ता बहुतेक लोकांमध्ये ही समस्या आहे, जर त्यांना असे वाटले की काहीतरी महत्वाचे आहे, तर ते त्याबद्दल भयानक गंभीर होतील. जर त्यांना असे वाटले की ते इतके महत्त्वाचे नाही आहे की ते त्याबद्दल ढिसाळ होतात - ते आवश्यक सहभाग दाखवत नाहीत. जेव्हा कोणी म्हणतो, “तो खूप गंभीर स्थितीत आहे,” म्हणजे त्याचा पुढीची पायरी म्हणजे आपल्याला कोठे आहे हे माहित आहे. बरेच लोक गंभीर स्थितीत आहेत. त्यांच्या बाबतीत फक्त एकच गोष्ट घडणार आहे जिला काहीतरी महत्व आहे. बाकी सगळ्या त्यांच्यापासून दूर जातील कारण त्यांना जी गोष्ट गंभीर वाटत नाही अशा कोणत्याही गोष्टीत ते गुंतवणूक आणि समर्पण दाखवण्यात ते असमर्थ आहेत. तीच सगळी समस्या आहे. तर मार्ग, जीवनाचे रहस्य फक्त यामध्ये आहे - प्रत्येक गोष्ट गंभीर नसलेल्या डोळ्याने, परंतु पूर्णपणे समरस होऊन - एखाद्या खेळासारखी बघणे. म्हणूनच जीवनातील सर्वात गहन पैलू उत्सव म्हणून बघितले आहेत जेणेकरून तुमच्याकडून मुख्य गाभा सुटला जाऊ नये.

दिवाळीची कल्पनाच ही आहे की तुमच्या आयुष्यात उत्सवाची पैलू आणणे - म्हणूनच फटाके, तुम्हाला थोडसं पेटवण्यासाठी! तर फक्त या दिवशी मजा करणे आणि सोडून देणे हा हेतू नाही. आपल्यात दररोज असेच घडले पाहिजे. जर आपण सहजपणे बसलो तर आपली जीवन ऊर्जा, हृदय, मन आणि शरीर जिवंत फटाक्यासारखे पेटलेले पाहिजे. जर तुम्ही मंद,मरगळलेले असाल तर तुम्हाला दररोज बाहेरून फटाक्यांची आवश्यकता आहे.