मिताली राज: नमस्कार! मी मिताली राज. सदगुरू जी, आमच्या बद्दल दरदिवशी उठणाऱ्या मतांकडे दुर्लक्ष करण्याची ताकद कुठून आणी कशी मिळवायची, याबद्दल थोडं सांगू शकाल का?

सदगुरू: नमस्कार मिताली. लोकांचं प्रत्येक गोष्टीबद्दल मत असतं, पण तुला किंवा कुणालाही यानं फरक का पडावा? कारण इतरांचं मत आपल्यासाठी तेव्हाच महत्वाचं ठरतं जेव्हा आपण काय करतोय हे आपल्यालाच स्पष्ट नसतं तेव्हा. तर इतरांच्या मताविरुद्ध लढण्याऎवजी, आपण काय करतोय आणी कशासाठी करतोय याबद्दल आपल्यात स्पष्टता निर्माण करणं. जर ही स्पष्टता आपल्या आत वाढली, तर इतरांचा मतानं काही फरक पडणार नाही. 

एकेकाळी तुम्हाला फक्त दोन किंवा तीन किंवा पाच लोकांच्या मतांशी लढावं लागायचं. आज तुम्हाला ५० लाख लोकांच्या मतांशी लढावं लागतं. कारण ते सर्वजण स्वत:ला व्यक्त करत फिरताहेत.

लोकांची आपल्याबद्दल मतं ही असतीलच, हा त्यांचा अधिकार आहे. प्रसिद्ध कानडी संत बसवण्णा म्हणतात, "तुम्ही तुमचं घर डोंगरावर आणी जंगलात बांधलंत, तर तुम्हाला जनावरांची भितीये. तुम्ही तिथे असायलाच नको होतं. मग तुम्ही बाजारपेठेत घर बांधलंत, आता बाजारपेठेतल्या आवाजांची तुम्हाला भितीये. ती तुम्हाला राहाण्यासाठी  योग्य जागा नाहिये. आता तुम्ही समाजात राहता आणी इतर लोक काय म्हणतील याची तुम्हाला भितीये.“

आज आपण समाजात वावरतो, आणि लोक काय म्हणतील याची तुम्हाला भीती वाटते.हा सामाजिक जीवनाचा एक भाग आहे. कुणीतरी सतत काहीतरी म्हणत राहणार. पण आज ते सोशल मिडियामुळॆ मोठं बनवलं जातंय. पण नेहमीच लोकांची मतं होतीच.

सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आपल्या आयुष्यात पूर्ण स्पष्टता आणणं, की आपण काय करतोय आणी ते का करतोय याबद्दल. जर हे आपल्याला स्पष्ट असेल, तर इतर लोक काय म्हणतात यानं काहीच फरक पडणार नाही. 

एकेकाळी तुम्हाला फक्त दोन किंवा तीन किंवा पाच लोकांच्या मतांशी लढावं लागायचं. आज तुम्हाला ५० लाख लोकांच्या मतांशी लढावं लागतं. कारण ते सर्वजण स्वत:ला व्यक्त करत फिरताहेत. यात काही हरकत नाही, ते त्यांना हवं ते म्हणू शकतात, पण सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आपल्या आयुष्यात पूर्ण स्पष्टता आणणं, की आपण काय करतोय आणी ते का करतोय याबद्दल. जर हे आपल्याला स्पष्ट असेल, तर मतं हवेत फिरत राहतील, आणी मतं बदलतीलहीतू  फक्त बॉल व्यवस्थित टोलव, आणि तुला दिसेल की सर्वांची मतं बदलतील.  धन्यवाद.

मी ऎकलंय की तु बॉल उत्तम टोलवतेस. फक्त बॉल टोलवत रहा आणी सर्वांचं मत बदलेल.

संपादकीय टीप: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा, UnplugwithSadhguru.org वर.

Youth and Truth Banner Image