खरा मित्र कसं ओळखाल?

खरा मित्र कोण असतो? मैत्री कायम ठेवण्यासाठी छान छान गोष्टी करणारी व्यक्ती की मैत्री गमावण्याच्या धोक्याचा विचार न करता आवश्यक असणाऱ्या गोष्टी सांगणारी व्यक्ती? जर आपण एखाद्याशी मैत्री केलेली असेल तर, त्या व्यक्तीचे काय चुकते आहे हे तिला सतत टाकून बोलण्याची तुम्हाला आवश्यकता नाही; असं करायची गरज नाही. परंतु त्याच वेळी लोकांमध्ये अप्रिय होण्याचं धैर्य देखील तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. दोन व्यक्तींना सामाईक कारणं सापडली की बहुतेक मैत्री घडून येतात, पसंती आणि नापसंती आपापसात वाटणे आणि एकमेकांच्या विचारसरणीचे समर्थन करणे. पण, सद्गुरु स्पष्ट करतात की जणू अॅप्पल आणि संत्र्या प्रमाणे भिन्न असलेल्या व्यक्ती सुद्धा प्रेमळ, जिवलग मित्र होवू शकतात, यासाठी गरज त्यांच्यामध्ये एक दुसऱ्यासाठी सर्वोत्तम कृती करण्याचं धैर्य.
 
 
 
 

सद्गुरु: तुमची विचारसरणी, भावना, समज, पसंती आणि नापसंती यांचे समर्थन करणाऱ्या लोकांशीच तुम्ही नेहमी मैत्री करत असता. तुमचा स्वतःबद्दलचा जो काही व्यर्थ समज करून ठेवला आहे त्याचं समर्थन करणाऱ्या कुणाला तरी तुम्ही शोधत असता.

मागच्या हिवाळ्यातील गोष्ट आहे, एका लहानशा पक्षाला शरद ऋतू थोडा जास्तच आवडला आणि त्याने दक्षिणेकडील प्रवासास लवकर सुरुवात केली नाही. हिवाळ्यात जरा उशीराच सुरुवात केली आणि बाहेर उडण्याचा प्रयत्न केला पण गारठून खाली पडला. एक गाय त्या वाटेने जात होती आणि तिने रस्त्यावर शेणाचा ढीग टाकला. शेण थेट पक्षावर पडले आणि पक्षी त्यात झाकला गेला. शेणाच्या उबदारपणामुळे हळूहळू पक्षाची थंडी कमी झाली आणि त्याला बरं वाटायला लागलं आणि त्याने आनंदाने चिवचिव करायला सुरु केलं.

एक मांजर त्या वाटेने जात होती. तिने ती चिवचिव ऐकली, आजूबाजूला बघितलं आणि तिच्या लक्षात आले की ती चिवचिव शेणाच्या ढिगातून येत आहे. तिने शेण बाजूला सारलं, पक्षाला शेणातून बाहेर काढलं आणि खाऊन टाकलं.  तर, जो कोणी तुमच्यावर कचरा टाकतो, तो तुमचा शत्रुच असण्याची गरज नाही. जो कोणी तुम्हाला कचऱ्यातून बाहेर काढतो, तो तुमचा मित्रच असेल असं नाही.  आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जेव्हा तुमची कचऱ्याच्या ढिगाखाली अडकले असता, तेव्हा तोंड बंद ठेवा.

अप्रिय होण्यासाठी लागणारे धैर्य

जर तुम्ही एखाद्याशी मैत्री केली असेल तर, त्यांचं काय चुकतंय हे सतत त्यांना टाकून बोलत सांगण्याची गरज नाही. परंतु त्याच वेळी लोकांमध्ये अप्रिय होण्याचे धाडस देखील तुमच्यात असणं गरजेचं आहे. लोकांमध्ये लोकप्रिय होण्याच्या प्रयत्नात, तुमच्या आसपास सुखद वातावरण जपत असताना, तुमच्या आत किती कडवटपणा तुम्ही लपून ठेवलाय याचा शोध घ्या.

जर तुमचा कडवटपणा लपून ठेवला, तुमची कडवटपणाची बीजं जर तुम्ही जमिनीत पुरली असतील, तर तुम्हाला कडवट फळंच मिळतील. जर तुमच्याकडे मित्र असेल, तर त्यांच्याशी अप्रिय होण्याचं धाडस तुमच्याठायी असलं पाहिजे आणि तरीही तुम्ही त्यांच्याशी जिवाभावाने असू शकता.  पण सध्या तुमची मैत्री हि नेहमीच व्यवहारिक, पसंत आणि नापसंतीवर केलेली असते. पण जरी तुम्ही जणू अॅप्पल आणि संत्र्याप्रमाणे अगदी भिन्न व्यक्ती जरी असलात, तरीही तुम्ही जिवलग मित्र होऊ शकता. एक सच्चा मित्र तो असतो ज्यामध्ये तुमचे सर्व अवगुण सांगण्याचं धाडस असतं आणि तरीही तो तुमच्याशी जिवाभावाने वागतो – यालाच खरी मैत्री म्हणतात.

एके दिवशी, अमेरिकी सैन्यातील तीन सेनापतींची गाठ झाली. ते त्यांच्या सैन्यासह, ग्रँड कॅनियनच्या (अमेरिकेतील प्राचीन डोंगराळ प्रदेश) दौऱ्यावर होते. पहिल्या सेनापतीला त्याच्या बटालियनमधील धैर्य आणि आज्ञाधारकपणाच्या भावनेची फुशारकी मारायची होती, म्हणून ते म्हणाले, "माझ्या बटालियनसारखी इतर कोणतीही बटालियन नाही. धैर्य आणि आज्ञाधारकतेची पातळी खूप उच्च आहे. काय ते धैर्य! मी तुम्हाला एक उदाहरण दाखवतो." ते गरजले,"प्रायव्हेट पीटर!"

प्रायव्हेट पीटर धावत आला, "येस, सर!"

"तुला दिसणारं हे," ग्रँड कॅनियनच्या दिशेने बोट करत सेनापती म्हणाले.  "माझी इच्छा आहे तू याक्षणी या दरीवरून पलीकडे उडी घ्यावी!"

तो सैनिक लगेच पळत आला, आणि पूर्ण वेगात त्याने उडी घेतली.  उघड आहे, तुम्हाला कळलंच असेल तो कुठे पोहोचला ते.

मग दुसरे सेनापती हसले आणि म्हणाले, "ते काहीच नाही.  इकडे पहा." "ट्रूपर हिगीन्स!"

"येस, सर!" ट्रूपर हिगीन्स आला.

"ही आणीबाणीची स्थिती आहे. माझी इच्छा आहे की तू या दरीच्या पलीकडे उडून जावे आणि माझ्या तिथल्या अधिकाऱ्यास याची खबर द्यावी."

त्या सैनिकाने आपले हात फडफडविले, आणि तुमच्या लक्षात आलंच असेल पुढं काय घडलं ते.

तिसरा सेनापती फक्त शांत होता. इतर दोघांनी त्यांला कोपराने सहज ढकलत म्हटलं, "आहे काही तुमच्याजवळ?" आणि हसत त्यांनी म्हटलं, "डरपोक"

तिसऱ्या सेनापतीची काही माणसं सभोवताली रेंगाळत होती, त्यांनी त्यांना म्हटलं, "अरे तू इकडे ये." त्यापैकी एकजण पुढे आला. सेनापती म्हणाले, "आता तिकडे खाली पहा," आणि त्यांनी उंच धबधब्यावरून दोनशे मीटर खोलीवर असलेल्या गोल गोल फिरणाऱ्या जलद गतीच्या प्रवाहाकडे बोट दाखविले. ते म्हणाले, "माझी इच्छा आहे तू ही छोटी होडी घ्यावी आणि नदी पार करावी." 

खाली बघून तो माणूस म्हणाला, "सेनापती, व्हिस्की तुम्हाला जरा जास्तच लागलीय वाटतं. मी अशी अगदी मूर्खपणाची गोष्टी करणार नाही."

मग या सेनापतीनी इतर सेनापतींकडे पाहत म्हटलं, "पाहा, हे खरं धैर्य आहे."

तुमच्या मित्रासाठी काय चांगलं आहे?

आपल्या मैत्रीविषयी जरा अधिक धैर्यवान व्हा. मित्रांना गमावण्यास तयार रहा, त्यात चुकीचं काही नाही. जर तुम्हाला त्यांची काळजी असेल तर, त्यांच्यासाठी जे हितावह आहे ते केलं पाहिजे, स्वत:साठी नव्हे.

माझ्या ओळखीचे एक डॉक्टर होते जे बियर पीत. मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा ते जवळजवळ सत्तर वर्षांचे होते – जरा जाड आणि एक मोठं पोट असलेली असामी. काही दिवसांपूर्वी, ते नेहमी त्यांच्या मित्रांना भेट देत असत. ते जेव्हा कधी त्यांच्या घरी जात असत, त्यांचा मित्र त्यांना बियर देत असे आणि दोघंमिळून बियर पीत असत.  जेव्हा कधी त्यांना वेळ मिळत असे, एकतर त्यांचा मित्र त्यांच्याकडे यायचा किंवा ते त्याच्याकडे जात. 

अचानक एक दिवस मित्राला कुणी गुरू भेटले आणि त्यांनी आध्यात्मिक साधना करायला सुरुवात केली आणि बियर पिणं सोडून दिलं.  अशा प्रकारे ते डॉक्टर मला ही संपूर्ण कथा अगदी बारकाईनं सांगत असत आणि म्हणत की तो एक जिवलग मैत्रीचा शेवट होता.  त्याना पुन्हा आपल्या मित्राच्या घरी कधीच जावसं वाटलं नाही, कारण त्याने बियर पिणं बंद केलं. बऱ्याच मैत्री अशाच संपतात. जोपर्यंत काहीतरी वाहत असतं, मैत्री असते. ज्या क्षणी ते ते थांबतं, सर्वकाही संपतं.

जर तुमच्या आयुष्यात एक खरा मित्र नसेल तर, तुमच्याकडे कशाची तरी उणीव असते. शेवटी, मित्र काय आहे? एक मित्र तुमच्यासारखीच आणखी एक संभ्रमित व्यक्ती असते. एक मित्राचा अर्थ असा नाही की तो एक परिपूर्ण मनुष्य आहे. जेव्हा दोन व्यक्ती प्रामाणिकपणे एकमेकांशी पुरेशा मनमोकळेपणाने संवाद साधण्यासाठी जवळ येतात, तेव्हा ते मित्र बनतात. तुमचा मित्र सुद्धा तुमच्या इतकाच गोंधळलेला असतो, पण जर दोन व्यक्ती प्रामाणिकपणे एकमेकांच्या सहवासात असतील, तर ते मित्र बनतात. तुमच्याजवळ अनेक खरे मित्र हवेत, केवळ एकच नव्हे.  पण जर तुमच्याजवळ एकही मित्र नसेल, तर तुमच्या आयुष्यात याबद्दल काहीतरी केलंच पाहिजे.

 
 
  0 Comments
 
 
Login / to join the conversation1