ब्रम्हचर्य हा नेहेमीच भारतीय आध्यात्मिक प्रक्रियेचा एक अभिन्न भाग बनून राहिलेला आहे. ब्रह्मचर्य म्हणजे काय, आणि ब्रम्हचारी कोणाला म्हणावे यावर सद्गुगुरु बोलत आहेत.

सद्गगुरु“ब्रम्हन्” म्हणजे “दिव्य” किंवा “सर्वोच्च”. चर्या म्हणजे “मार्ग.”  तुम्ही जर दिव्यत्वाच्या मार्गावर असलात, तर तुम्ही ब्रम्हचारी आहात. दिव्यत्वाच्या मार्गावर असणे म्हणजे तुमच्या व्यक्तिगत अशा कोणत्याही आशा, महत्वाकांक्षा नाहीत. जे गरजेचं आहे तेव्हडंच तुम्ही करता. आयुष्यात कुठे जायचे आहे, काय करावं, किंवा तुम्हाला काय आवडते आणि काय नाही; यामध्ये तुमच्या वैयक्तिक आवडी-निवडी नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वेच्छेने त्यागल्या आहेत. जर तुम्ही ते तुमच्या इच्छेविरुद्ध कराल, तर तो एक असह्य छळ होईल. पण जर तुम्ही स्वेच्छेने तसे कराल, तर तुमचे जीवन अगदी विलक्षण आणि सुंदर बनेल, कारण उपद्रव देणारी अशी कुठलीच गोष्ट असणार नाही. जे गरजेचे आहे केवळ तेच तुम्ही करता; आणि मग जीवन अगदी सहज, सोपं होऊन जातं. अशा जीवन-चर्येत एकदा जर का तुम्ही स्वतःला झोकून दिलात, तर मग तुम्हाला आध्यात्मिक मार्गाची काळजी करावी लागणार नाही किंवा तुमच्या अध्यात्मिकतेची सुद्धा तुम्हाला काळजी करावी लागणार नाही. त्याची आपोआप काळजी वाहिली जाते. तुम्हाला खरच त्यासाठी काहीही करावे लागणार नाही.

लोकं असं वाटू शकतं की ब्रम्हचारी खूप मोठा त्याग करतात आणि त्यांना आयुष्यातील सुख-सुविधा, ऐष-आराम उपभोगू दिला जात नाही. परंतु ते तसे अजिबात नाहीये. एखादी व्यक्ती केवळ त्यानी परिधान केलेल्या वेशभूषेमुळे ब्रम्हचारी असेल, तर जीवन म्हणजे एक असह्य छळ असेल हे खरं आहे. पण एखादी व्यक्ती जी खरोखर दिव्यत्वाचा मार्ग चालत आहे, तिला संसाराचे क्षुल्लक, छोटे-मोठे उपभोग अगदीच नीरस, निरर्थक वाटतात. एकदा जर का तुम्ही तुमच्या अस्तित्वाचा आंतरिक आनंद अनुभवू लागलात, की बाह्य जगातील ऐष-आराम, उपभोग अगदी निरर्थक वाटू लागतात.

प्रत्येकाने ब्रम्हचारी बनलंच पाहिजे; पण बाह्य जीवन-शैलीनुसार नव्हे तर, तर अंतर्मनातून.

याचा अर्थ असा होतो का, की प्रत्येकानं ब्रम्हचारी बनलंच पाहिजे? हो! प्रत्येकाने ब्रम्हचारी बनलंच पाहिजे; पण बाह्य जीवन-शैलीनुसार नव्हे तर, तर अंतर्मनातून. प्रत्येकाने दिव्यत्वाच्या मार्गावर चाललं पाहिजे. ब्रम्हचर्य म्हणजे केवळ शारीरिक संबंधापासून अलिप्त असणे नव्हे. संपूर्ण ब्रम्हचर्य प्रक्रियेच्या अनेक पैलूंपैकी हा केवळ एक सहायक पैलू म्हणून पाळला जातो. एक ब्रम्हचारी बनणे म्हणजे तुम्ही तुमच्या प्राकृतिक स्वभावानेच आनंदी आहात. तुम्ही विवाहित असूनही ब्रम्हचारी असू शकता. हे शक्य आहे कारण तुम्ही तुमच्या नैसर्गिक स्वभावानेच आनंदी आहात; तुमचा पती किंवा पत्नीतून तुम्ही तुमचा आनंद पीळून काढायचा प्रयत्न करीत नाही आहात. आणि हे असंच असायला हवं. संपूर्ण जग ब्रम्हचारी बनलं पाहिजे. प्रत्येकाने त्यांच्या स्वभावातूनच आनंदी असलं पाहिजे. जर दोन व्यक्ती एकत्र येत असतील, तर आनंद वाटून घेण्यासाठी, एकमेकांतून आनंद पिळून काढण्यासाठी नव्हे.

भविष्यासाठी गुंतवणूक

तर मग एक विशिष्ट नियोजनबद्ध प्रक्रिया का स्थापली आहे? जर एखाद्या व्यक्तीला त्यांच्या जीवनाच्या अखेरीस जर साक्षात्काराचा अनुभव घ्यायचा असेल, तर तो विविध मार्गानी घेतला जाऊ शकतो. मी त्या दिवसासाठी तुमची सोबत करू शकतो! पण एखाद्याला ते अनुभवायचे असेल, आणि फक्त अनुभवायचेच नाही, तर इतरांना सुद्धा तो अनुभव उपलब्ध करून देण्यासाठी एक सहाय्यक साधन बनायचे असेल, तर ब्रम्हचार्य महत्वाचे बनते. ब्रम्हचारी हे, आध्यात्मिकतेला त्याचा सर्वोच्च शुद्ध स्वरुपात अबाधित ठेऊन एका पिढीतून दुसर्‍या पिढीत तो ज्ञानाचा वारसा पुढे नेण्यासाठी; भविष्यासाठी केलेली एक गुंतवणूक आहेत. यासाठी ब्रम्हचारींचा, एक लहान पण समर्पित समूहाची गरज लागते. त्यांना अशा पद्धतीने दीक्षित केले जाते, की त्यांची जीवन ऊर्जा एका वेगळ्याच दिशेने बदलली जाते. प्रत्येकाने हे पाऊल उचलणे आवश्यक नाहीये, आणि आम्हीसुद्धा सर्वाना यामध्ये सहभागी करून घेऊ असे नाही, कारण तसे करणे आवश्यक नाही आणि, त्यासाठी अवश्यक असणारी आणि अपेक्षित असणारी साधना सुद्धा ते करू शकणार नाहीत.   

आपण सर्वांनी आंबे खाल्ले आहेत, पण आपल्यातील किती जणांनी आंब्याची झाडे लावली, ती वाढवली आणि मग आंबे खाल्ले आहेत?

आपण सर्वांनी आंबे खाल्ले आहेत, पण आपल्यातील किती जणांनी आंब्याची झाडे लावली, ती वाढवली आणि मग आंबे खाल्ले आहेत? बहुतेक लोकांनी आंबे खाल्ले आहेत कारण इतर कोणीतरी आंब्याची झाडे लावली होती. प्रत्येक समाजात हजार लोकांपैकी किमान दहा लोकांनी आंब्याची झाडे लावण्याची काळजी घेतली पाहिजे. त्याच प्रमाणे, काही लोकांनी ब्रम्हचर्याचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. स्वतःचे आयुष्य इतरांच्या कल्याणासाठी समर्पित करण्याची इच्छा असलेल्या लोकांची समाजाला गरज आहे. इतरांच्या कल्याणाबद्दल विचार करण्यासाठी जर कोणीही नसेल, तर तो समाज नक्कीच विनाशाकडे वाटचाल करीत आहे असे समजा. आणि आज समाजाच्या बाबतीत तेच घडत आहे. आज समाजात इतरांच्या कल्याणाचा विचार करणारी खूपच कमी लोकं आहेत.    

एखाद्या रॉकेटप्रमाणे! 

मूलतः मानवी यंत्रणा ही एक ठराविक ऊर्जा प्रणाली आहे. त्या प्रणालीत, अनेक दारं ठेऊन; तुम्ही जगाशी एक ठराविक मार्गाने व्यवहार करू शकता किंवा तीला एक साचेबंद प्रणाली बनवून एक तीव्र केंद्रित ठेवू शकता. रॉकेट वरच्या दिशेने जाते कारण त्याची संपूर्ण उर्जा एकाच दिशेने, तीव्रतेने उर्जित होत असते. जर त्याचे उर्जा सर्वबाजूनी प्रक्षेपित होऊ लागली, तर ते कुठल्याच दिशेने जाऊ शकणार नाही, त्यातील उर्जेचा तिथल्या तिथेच व्यय होईल. किंवा ते इतर कुठल्या तरी दिशेने जाऊन मोडून खाली पडेल. तर ब्रम्हचाऱ्यातून आम्ही असं काही साकार करण्याचा प्रयत्न करत आहोत, की त्याची संपूर्ण उर्जा एकाच दिशेने प्रक्षेपित होईल. जे एकाच दिशेने उर्जा प्रक्षेपित करते ते सरळ वरच्या दिशेने कूच करेल, आणि अशी प्रणाली तयार करण्यामागे काही विशिष्ट उद्देश सुद्धा आहे.

हे एक असे शस्त्र आहे ज्याचा वापर करून घेऊन तुम्ही आध्यात्मिक प्रणालीचा मारा जगावर करू शकता.

जेव्हा तुमच्याकडे अशा स्वरूपाची बंदिस्त साचेबंद प्रणाली असते, तर ती एक शक्तीशाली प्रणाली असते. तीचा वापर अनेक मार्गानी आणि अनेक पद्धतीनी करून घेता येतो. हे एक असे शस्त्र आहे ज्याचा वापर करून घेऊन तुम्ही आध्यात्मिक प्रणालीचा मारा जगावर करू शकता.

प्रत्येक संस्कृतीत साधू-संन्यासी असतातच; कारण ज्याठिकाणी ज्ञानप्राप्तीची खरी प्रक्रिया होती, त्यासाठी त्यांना एका अश्या प्रणालीची गरज होती जी सर्वांना एकत्रितरित्या बांधून ठेऊ शकेल. बाह्य जगाशी त्यांचे कोणतेही व्यवहार होणार नाहीत. ती स्वयं-परिपूर्ण असेल. जगाला एखाद्या विशिष्ट मार्गाने न्यावयाचे असेल, तर काही विशिष्ट प्रक्रिया स्थापन करायच्या असतील, काही विशिष्ठ गोष्टी साध्य करायच्या असतील, तर तेव्हा अशा प्रणाली फार आवश्यक असतात. तुम्हाला पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर उपग्रह पोहोचवायचा असेल, तर तुम्हाला रोकेटची गरज लागते. तुम्हाला जर केवळ पृथ्वीच्या वातावरणातच फिरायचे असेल, तर त्यासाठी विमान पुरेसे आहे. हाच फरक आहे. जेंव्हा तुम्ही कोणत्याही विशिष्ट मर्यादांच्याच्या बाहेरील काही योजना तयार करत असता, तेंव्हा ब्रम्हचारी आवश्यक असतात.

Editor’s Note: “Mystic’s Musings” includes more of Sadhguru’s insights on spirituality. Read the free sample or purchase the ebook.