अमावस्या - यात्रा असत्याकडून सत्याकडे!

या लेखात सद्गुरू, अमावस्येचा मानवी रचनेवर होणाऱ्या परिणामांविषयी बोलत आहेत.
 

प्रश्नकर्ता: सद्गुरू, अमावस्येचे महत्व काय आहे?

सद्गुरू: अमावस्या म्हणजे चंद्र उगवत नाही तो दिवस.  जेंव्हा एखादी व्यक्ती  किंवा गोष्ट अनुपस्थित असते, तेंव्हा त्या अनुपस्थितीद्वारे त्यांच्या उपस्थितीला महत्व प्राप्त होते. तुमचा एखादा मित्र किंवा आवडती व्यक्ती तुमच्यासोबत असते तेंव्हा तुम्हाला त्यांच्या उपस्थितीची जाणीव नसते. परंतु ते ज्या क्षणी तुमच्या पासून दूर होतात, तेंव्हा त्यांची उपस्थिती प्रकर्षाने जाणवते – होय ना? भावनिक पातळीवर सुद्धा हे खरं  आहे. ते तुमच्या बरोबर असताना तुम्हाला त्यांची उपस्थिती जाणवत नाही. त्यांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी त्यांच्या उपस्थितीपेक्षाही अधिक मोठ्या प्रमाणावर जाणवते. त्याच प्रमाणे, चंद्राच्या बाबतीत सुद्धा त्याची अनुपस्थिती त्याच्या  उपस्थितीपेक्षा अधिक प्रकर्षाने जाणवून येते. इतर कोणत्याही दिवशी, अगदी पौर्णिमेला सुद्धा तो आकाशात असतोच, परंतु अमावस्येला मात्र त्याची अनुपस्थिती अधिकच जाणवते.

अमावस्येला पृथ्वी विश्रांती घेत असते; पृथ्वीवरील जीवन प्रक्रिया मंदावलेली असते, ही एक फार मोठी संधी आहे; कारण या दिवशी जीवनाचे समाकलन अधिक चांगल्या प्रकारे घडते. जेव्हा सृष्टीची गती थोडीफार मंदावते, तेंव्हाच तुमचे लक्ष तुमच्या शरीराकडे जाते. जेंव्हा सर्वकाही सुरळीत चाललं असतं आणि तुम्ही व्यस्त असता, तेंव्हा तुमच्या शरीरात काय घडते आहे याकडे तुमचे लक्ष नसते; तुम्ही म्हणजे जणू फक्त शरीरच आहात असं तुम्हाला वाटतं. पण थोडं सुद्धा आजारपण आलं, तर अचानक शरीर ही एक समस्या बनते आणि तुम्हाला शरीराकडे लक्ष द्यावेच लागते. शरीर जेव्हा व्यवस्थित कार्य करत नाही, तेंव्हाच तुमच्या लक्षात येते, “हे शरीर म्हणजे मी नाही. हे केवळ माझे शरीर आहे जे मला त्रास देत आहे.” स्पष्ट असा वेगळेपणा निर्माण होतो.

अमावस्येच्या दिवशी एखाद्या व्यक्तीला ‘मी म्हणजे काय आणि मी म्हणजे काय नाही’ याची जाणीव सहजरीत्या होते. आणि मग तेंव्हापासून, असत्याकडून सत्याकडचा प्रवास सुरू होतो.

तर अमावस्येचे हे महत्व आहे. या दिवशी पंचमहाभूतांचा विशिष्ट प्रकारचा विलय होत असल्याने, सर्वकाही संथगतीने घडत असते. तुम्ही जर स्वास्थ्य आणि कल्याणाच्या प्राप्तीचे इच्छुक आहात तर पौर्णिमेचा दिवस पवित्र आहे, आणि जर मुक्तीच्या शोधात असाल तर अमावस्येचा दिवस पवित्र आहे. या दोन पैलूंना अनुसरून विविध प्रकारची आचरणे आणि साधना आहेत. या दिवशी एखाद्या व्यक्तीला ‘मी म्हणजे काय आणि मी म्हणजे काय नाही’ याची जाणीव सहजपणे  होते. आणि मग तेंव्हापासून, असत्याकडून सत्याकडचा प्रवास सुरू होतो. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत प्रत्येक महिन्यात ह्या संधी नैसर्गिकरीत्या निर्माण झालेली असतात. जे याबद्दल पूर्णतः अनभिज्ञ आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा प्रत्येक अमावस्येपासून ही संधी उपलब्ध असते. 

बहुतांशी पौर्णिमा ईडा नाडी किंवा स्त्रीस्वरूप आहे. पण अमावस्या मात्र अगदी अपक्व आहे. अमावस्येच्या आधीच्या दिवसाला शिवरात्री म्हणतात, कारण ही शिवाची रात्र आहे. तीचे स्वरूप ब्रम्हांड उत्पतीचे आहे. जेव्हा घनघोर अंधार असतो, तेंव्हा सृष्टी जणू विरघळून जात असते. अमावस्येत एक विनाशकाची छटा आहे. सामान्यतः, अमावस्येच्या रात्री स्त्रीउर्जा एकतर विक्षुब्ध होऊ शकते, कारण या रात्री तिच्या मनात एक विशिष्ट प्रकारची भीती आणि अस्वस्थता निर्माण होतो, किंवा ती पुरुषांप्रमाणे कठोर होऊ शकते.

पौर्णिमा स्त्रीउर्जेसाठी अधिक उपयुक्त आहे. म्हणून स्त्रिया पौर्णिमेचा उपयोग करून घेतात, त्या सहज रमतात. पण एक पुरुष जो विरक्तीच्या शोधात आहे, त्याला पौर्णिमा काही उपयोगाची नाही. पण तो स्वास्थ्यप्राप्तीचा इच्छुक असेल तर पुरुष सुद्धा पौर्णिमेचा उपयोग करून घेऊ शकतात, पण जर तो विरक्ती किंवा मुक्तीच्या शोधात असेल तर अमावस्या अधिक चांगली. ज्या कोणाला संपूर्ण विरक्ती हवी आहे, त्यांच्यासाठी अमावस्या  सर्वोत्तम आहे

आपण कदाचित हे ऐकले असेल, की मानसिकरित्या थोड्या असंतुलित असणाऱ्या व्यक्ती पौर्णिमा आणि अमावस्येला अधिक असंतुलित होतात. याचे कारण म्हणजे, चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव पृथ्वीवर पडत असतो. आणि ती शक्ती सर्वकाही वर खेचून घेत असते. सगळे समुद्र, महासागर वर उठायचा प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे तुमच्या  शरीरातील रक्त सुद्धा चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे वर खेचले जात असते. याच कारणास्तव, तुम्ही जर मानसिकरित्या थोडे असंतुलित असाल, तर त्या दिवशी तुमच्या मेंदूत होणाऱ्या अतिरिक्त रक्तप्रवाहामुळे, तुम्ही जरा जास्तच असंतुलित व्हाल. तुम्ही जर आनंदी असाल, तर अधिक आनंदी व्हाल; जर दुखीः असाल, तर अधिकच दूखीः व्हाल. तुमचा जो काही गुण असेल, त्या दिवशी त्यांचे प्रमाण जरा वाढते कारण शरीरातील रक्त मेंदूच्या दिशेने वर खेचले जात असते. म्हणजेच तुमची संपूर्ण ऊर्जाच एक प्रकारे वरच्या दिशेने खेचली जात असते. एक आध्यात्मिक साधक, जो सतत शक्य तितके सर्वकाही आपली ऊर्जा वरच्या दिशेने प्रवाहित करण्याच्या प्रयत्नात असतो, अशा लोकांना हे दोन दिवस म्हणजे निसर्गाने दिलेले एक वरदानच आहे.

Editor’s Note: Stay in touch with important days in the year and the lunar month with Isha's Calendar, available as rss feed, ical, html (view in your browser), or embed the calendar on your site.

 
 
 
 
  0 Comments
 
 
Login / to join the conversation1