आढावा
 
इनर इंजिनीयरिंग आहे काय?
seperator
 
इनर इंजिनियरिंग हे योग विज्ञानातून निर्माण केलेलं असं तंत्रज्ञान आहे ज्यायोगे आपलं आयुष्य सर्वसंपन्न होतं.
सद्गुरुंनी तयार केलेला हा 7 सत्रांचा ऑनलाईन कोर्स, प्रत्येकी 90 मिनिटांचा आहे. जो आपल्या इच्छेनुसार आपले जीवन घडविण्यासाठी आणि स्वतःला सक्षम बनविणारी साधने आणि उपाय प्रदान करतो. तुमचा अवघा जीवनानुभव, तुमची कार्य करण्याची पद्धत आणि तुमचे सभोवतालचे जग अशा सर्व क्षेत्रात अमुलाग्र सकारात्मक बदल घडवून आणतो.
या कोर्सच्या माध्यमातून योग विज्ञानाचे शुद्ध सार असलेल्या पद्धतींचा वापर करून, जीवनाच्या मूलभूत तत्वांचा शोध, बौद्धिक पातळीवर अनुभवण्याची संधी आपल्याला प्राप्त होते. हा कोर्स आपल्याला आपले शरीर, मन, भावना आणि आंतरिक ऊर्जा उत्तमरित्या हाताळण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती प्रदान करतो.
इनर इंजिनियरिंग एक अभूतपूर्व संधी आहे स्व-परिवर्तनाची आणि स्वतःचा शोध घेण्याची जेणेकरून एक आनंदी आणि सुख-संपन्न जीवनाची खात्री करता येते.

वैद्यकीय आणि पोलीस कर्मचारी

वैद्यकीय आणि पोलीस सेवेत ह्या कठीण प्रसंगात युद्धपातळीवर कार्यरत असलेल्या सर्व बंधू-भगिनींचे आम्ही सदैव ऋणी आहोत जे स्वतःचा जीव धोक्यात घालून आम्हा सगळ्यांना सुरक्षित ठेवत आहेत करोना महामारीपासून. त्यांच्या सन्मानार्थ आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आम्ही भेट देत आहोत इनर इंजिनियरिंग ऑनलाईन पूर्णतः मोफत त्यांच्या स्वास्थ-समृद्धीसाठी.
आत्ताच मोफत नोंदणी करा
कोर्से वैशिष्ठ्ये
 
कोर्से वैशिष्ठ्ये
seperator
 
benefits
दैनंदिन व्यवहारोपयोगी साधने सहज जीवनासाठी
benefits
आयुष्यातील महत्वाचे पैलू हाताळण्यासाठी ध्यान क्रिया
benefits
समतोल आणि ताजेतवाने होण्यासाठी योगाभ्यास
benefits
जागरूकता उंचावण्यासाठी साधने
benefits
निरंतर सहाय सुविधा
benefits
आजीवन प्रश्नोत्तरांचे ट्रेजर ट्रोव्ह व्हिडीयोज उपलब्धता
कोर्सची रचना
 
कोर्सची रचना
seperator
 
सत्र १
समजून घ्या जीवनाचे नट्स आणि बोल्ट्स
"पृथ्वीवरील अतिप्रगत आणि परिष्कृत यंत्र म्हणजे मानवी शरीर. पण तुम्ही त्याचं युजर मॅन्युअलच वाचलं नाहीये. या, आपण त्याचा ठाव घेऊया." -सद्गुरू
सत्र २
एकमात्र बंधन
"तुमच्या इच्छेला पूर्णपणे मोकळं करा, तिला मर्यादित पैलुंशी सीमित करू नका. इछेच्या अनिर्बंध मुक्ततेत तुमचं परमोच्च स्वरूप दडलेलं आहे." -सद्गुरू
सत्र 3
जीवन पूर्णपणे जगा
“तुम्ही जे आहात, त्याच्या अबाधित विस्तारातच जीवन तुम्हाला पूर्णपणे जगू देतं. आयुष्य तुमच्या परमोच्च शक्यतांनिशी जगणे ही एकमेव परिपूर्णता तुमच्यातील जीवन जाणतं." -सद्गुरू
सत्र 4
तुम्ही जसा विचार करता, ते तुम्ही नाही आहात
“तुमच्या आयुष्यातील प्रत्येक कार्य-कृती पूर्णपणे इच्छुकतेने कराल, तर तुम्ही त्यातून स्वर्ग निर्माण करता. आणि जे काही बळजबरीने करता, तो नक्कीच तुमचा नरक असेल." -सद्गुरू
सत्र 5
मन - एक चमत्कार
“बहुतेक लोकं त्यांच्या मनावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करतायत. मला हवंय तुम्ही तुमचं मन त्याच्या संपूर्ण शक्यतेत मुक्त केलेलं." -सद्गुरू
सत्र 6
सृष्टीचा ध्वनी
“शब्द आणि अर्थ ही मानवी मनाच्या चौकटीतील क्षेत्रं आहेत - पण ध्वनी हा सृष्टीचा मुलभूत घटक आहे." -सद्गुरू
सत्र 7
आयुष्यात तुम्हाला हवं ते स्वतः निर्माण करा
“तुमचं आरोग्य आणि तुमचे आजार, तुमची खुशी आणि क्लेश, हे सगळं तुमच्या आतूनच निर्माण होतं. जर तुम्हाला सर्व संपन्नता हवी असेल, तर आता वेळ आली आहे तुम्ही तुमच्या आत डोकावण्याची." -सद्गुरू
फायदे
 
फायदे
seperator
 
benefits
दैनंदिन व्यवहारोपयोगी साधने सहज जीवनासाठी
benefits
आयुष्यातील महत्वाचे पैलू हाताळण्यासाठी ध्यान क्रिया
benefits
समतोल आणि ताजेतवाने होण्यासाठी योगाभ्यास

 

benefits
जागरूकता उंचावण्यासाठी साधने
benefits
निरंतर सहाय सहाय सुविधा
benefits
आजीवन प्रश्नोत्तरांचे ट्रेजर ट्रोव्ह व्हिडीयोज उपलब्धता

 

कोर्स शुल्क
 
कोर्स शुल्क
seperator
 
 
कोर्स भाषा किंमत  
इंग्लिश ₹3,500 आत्ताच नोंदणी करा
हिंदी ₹1,500 आत्ताच नोंदणी करा
तामिळ ₹1,500 आत्ताच नोंदणी करा
कानडी ₹1,500 आत्ताच नोंदणी करा
तेलुगु ₹1,500 आत्ताच नोंदणी करा
मराठी ₹1,500 आत्ताच नोंदणी करा
मल्याळम ₹1,500 आत्ताच नोंदणी करा
 
 
आपल्याला जर अकाऊंटची भाषा बदलण्याची सुविधा हवी असेल तर, कृपया इंग्लिश निवडा.
जर आत्ता आपण इतर भाषा निवडली, तर ती तुमच्या अकाऊंटची स्थायी भाषा होईल आणि त्यानंतर आपण इतर कुठल्याही भाषेची निवड करू शकणार नाही.
हा कोर्स तमिळ भाषा वगळता, इंग्रजीमधून इतर सर्व भाषांमध्ये डब केला गेला आहे.
 
लॉगीनबद्दलची माहिती
 
लॉगीनबद्दलची माहिती
seperator
जर आपण पहिल्यांदा ह्या कोर्ससाठी लॉगीन होत असाल - तर लॉगीन लिंक असलेली इमेल आपल्याला पाठवली गेली आहे.
जर आपण कोर्ससाठी परत लॉगीन करत असाल - तर कृपया इथे लॉगीन करा
 
संशोधनाचे निष्कर्ष
 
संशोधनाचे निष्कर्ष
seperator
 
 

 हार्वर्ड मेडिकल स्कूल रिसर्च

इनर इंजिनियरिंग ऑनलाईन केलेल्या सहभागींच्या स्ट्रेस संबंधित तक्रारी 50% घटल्या.

कॉर्पोरेट प्रोग्रॅम रिसर्च पार्टनर:

harvard-logo
 

रजर्स युनिव्हर्सिटी रिसर्च

इनर इंजिनियरिंग ऑनलाईनमुळे उत्साह, आनंद, सतर्कता आणि कार्यक्षमतेत वृद्धी.

कॉर्पोरेट प्रोग्रॅम रिसर्च पार्टनर:

rutgers-logo
संपर्क साधा
 
संपर्क साधा
seperator
 
इनर इंजिनीयरींग ऑनलाइन आणि इनर इंजिनीयरींग समापन(शांभवी महामुद्रा) कार्यक्रमाच्या नोंदणीसंदर्भात आपल्याला कोणतेही प्रश्न असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

कस्टमर सर्विस फोन

भारत: +022-4897-2450

 

सर्वसाधारण प्रश्न

indiasupport@innerengineering.com

सामान्य प्रश्न
 
नेहेमी विचारले जाणारे प्रश्न
seperator
 

इनर इंजिनियरिंग ऑनलाईन ही सद्गुरुंबरोबरची ७ सत्रांची मालिका आहे, प्रत्येक सत्रात ९० मिनिटांचा व्हिडियो असेल. प्रत्येक सत्रात मार्गदर्शित ध्यानाचा आणि शेवटी एका जागरूकतेचा अभ्यासाचा समावेश आहे, जो तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात या सत्रांची साधने वापरायला सक्षम बनवतो. जसे की हा कार्यक्रम म्हणजे एक क्रमाक्रमाने जाणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे सत्र मधेच वगळता येणार नाही आणि प्रत्येकाने ते संपूर्णपणे बघाणे आवश्यक आहे.

प्रत्यक्ष वर्गात बसल्यासारखा अनुभव यावा यासाठी सत्राचे व्हिडिओ, पुन्हा पाहण्याचा, रिवाइंड करण्याचा, किंवा फास्ट फॉरवर्ड करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. तुम्हाला एखादी गोष्ट समजली नाही, आणि तुम्हाला ती पुन्हा ऐकायची इच्छा असेल, तर त्यासाठी तुम्हाला 30 सेकंड रिवाइंड करणायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुम्ही एकदा सत्र पूर्ण केले, की तुम्हाला आपोपाप पुढील सत्राकडे घेऊन जाण्यात येईल. म्हणूनच या सत्रांसाठी कोणत्याही व्यत्ययाशिवाय आपण पुरेसा वेळ देणे अत्यंत आवश्यक आहे.

तुम्ही कोर्ससाठी नोंदणी केल्यापासूनच्या तारखेपासून ३० दिवसात हा कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे.

एकाच बैठकीत सर्व 7 सत्रे संपविण्याची आवश्यकता नाही, पण त्याचवेळेस दोन सत्रांमध्ये खूप अंतर ठेवणे देखील श्रेयस्कर नाही. आपण आपल्या दैनंदिन कामकाजानुसार वेळ निश्चित करू शकता, परंतु नोंदणी केल्याच्या तारखेपासून एका महिन्यामध्ये तुम्ही सर्व सत्र पूर्ण कराल याची खात्री करा.

सद्गुरुंनी गेल्या अनेक वर्षांत हजारो प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. प्रश्नोत्तर सत्रांचा एक अमूल्य संच उपलब्ध आहे तुमच्यासाठी कोर्समधील बोनस व्हिडिओ विभागाच्या ट्रेझर ट्रोव्हमध्ये. एकदा का तुम्ही तुमचे सत्र पूर्ण केले की प्रत्येक सत्राशी संबंधित प्रश्न खुले करून तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील.

यूट्यूबवरील व्हीडिओमध्ये विविध विषयांवर माहिती दिली जाते आणि भाष्य केले जाते, परंतु तो विशिष्ट असा कार्यक्रम किंवा पद्धत नाही. सद्गुरूंनी रचलेला इनर इंजीनीरिंग हा कार्यक्रम आपल्याला आपल्या इच्छेनुसार जीवन जगण्यासाठी सक्षम बनविण्याची साधने प्रदान करतो. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून योग विज्ञानाचे शुद्ध सार असलेल्या पद्धतींचा वापर करून जीवनाच्या मूलभूत तत्वांचा शोध बौद्धिक पातळीवर अनुभवण्याची संधी आपल्याला प्राप्त होते. हा अभ्यासक्रम आपल्याला आपले शरीर, मन, भावना आणि आंतरिक ऊर्जा व्यवस्थापित करण्याचे व्यावहारिक समज देतो.

इनर इंजिनियरिंग ऑनलाईन हे सध्या इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगु, कानडी आणि मराठी मध्ये उपलब्ध आहे. हे रशियन भाषेत देखील दिले जात आहे आणि आम्ही स्पॅनिश, चीनी आणि फ्रेंच भाषांतरांवर काम करीत आहोत.

तुम्हाला जर शांभवी महामुद्रा क्रिया शिकायची असेल आणि आपल्या दैनंदिन जीवनात परिवर्तनात्मक योगाभ्यास करायचा असेल, तर तुम्ही तुमचा इनर इंजिनियरिंग ऑनलाईन कोर्स पूर्ण झाल्यानंतर इनर इंजिनियरिंग समापन [कंप्लीशन] कार्यक्रमात सहभागी होणे गरजेचे आहे.

ट्रेझर ट्रोव्ह हा एक प्रश्नोत्तर व्हिडिओंचा संग्रह आहे ज्यात सदगुरू, त्यांना सत्रांमध्ये अगदी वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देतात तसेच अजून बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही तुमचे सत्र पूर्ण करायला हवे जर तुम्हाला त्या विशिष्ट सत्राचे ट्रेझर ट्रव्ह खुले करायचे असेल. उदाहरणार्थ, सत्र 2 च्या प्रश्नोत्तराचे व्हिडिओं तेंव्हाच बघायला मिळतील जेंव्हा तुम्ही सत्र २ पूर्ण करता. एकदा का तुम्ही सर्व 7 सत्रे पूर्ण केली, की तुम्हाला सर्व व्हिडिओंवर पाहायला मिळतील.

  • विंडोज किंवा मॅक ओएस असलेले कॉम्पुटर आणि काही लिनेक्स व्हर्जनसह काही स्टॅंडर्ड ब्राउझर उपलब्ध हवेत.
  • अँड्रॉइड टॅब्लेट आणि फोन (अँड्रॉइड वर्जन ४.२ आणि पुढील वर्जन) (ऑनलाईन कोर्स नव्या सद्गुरु ऍप्पमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध आहे.)
  • आयओएस डिव्हा‍इसेस (ऑनलाइन कोर्स नव्या सद्गुरू ऍप्पवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे)

इंटरनेट कनेक्शन आवश्यकता:

  • ब्रॉडबँड कनेक्शन (डीएसएल, केबल किंवा सॅटेलाइट) गरजचे आहे. व्हिडिओ कमीतकमी 350 केबीपीएसच्या डाउनलोड स्पीडसह प्रभावीपणे स्ट्रीम करायला. तुम्ही तुमचा इंटरनेटचा स्पीड bandwidthplace.com वर जाऊन तपासू शकता.
  • कोर्सच्या उत्तम अनुभवासाठी, हार्डवायर्ड नेटवर्क कनेक्शन असावे अशी आम्ही शिफारस करतो.
  • "समर्थित ऑपरेटिंग सिस्टम: विंडोज 7, 8 किंवा मॅक ओएस एक्स वर्जन 10.1.5 किंवा त्या पुढचे.
  • सपोर्टेड ब्राउझरः इंटरनेट एक्सप्लोरर, फायरफॉक्स, गूगल क्रोम (ची शिफारस) किंवा ऍप्पल सफारी
  • गुगल क्रोम ब्राउझर हे एक सर्वोतम ब्राउझर आहे या कोर्ससाठी कारण कोर्ससाठी गरजेचे असलेले सर्व आवश्यक सॉफ्टवेअरचे घटक त्यात अंगभूत आहेत.

कोर्सचे सगळे क्लासेस वायर्ड किंवा वायरलेस इंटरनेट कनेक्शनवर पाहू शकता. उत्तम व्हिडियो क्वालिटीसाठी आम्ही ब्रॉडबँड कनेक्शनची शिफारस करतो.

तुम्ही वापरत असलेली सिस्टीम इंटरनेटला कनेक्टेड आहे याची पुन्हा एकदा खात्री करा.

जर तुमच्याकडे चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल आणि तरीही व्हिडिओ सुरू होत नसेल, तर कृपया कॅशे साफ करा, लॉग आउट करा आणि पुन्हा लॉगिन करा. अद्याप समस्या कायम राहिल्यास, सपोर्ट टीमशी संपर्क इथे साधू शकता: info@InnerEngineering.com किंवा फोन करा (844) 474-2436.

होय. सगळे सत्र फुल्ल स्क्रीनमधून बघू शकता. जेव्हा तुम्ही व्हिडियो बघायला सुरुवात करता, तेव्हा फुल्ल स्क्रीन ऑप्शनवर क्लिक करा.

"व्हिडियो पाहण्यासाठी तुम्हाला कमीतकमी 350 केबीपीएस इंटरनेट स्पीडची आवश्यकता असेल. तुम्ही ब्रॉडबँड कनेक्शन (डीएसएल, केबल किंवा सॅटेलाइट) वापरावे अशी शिफारस केली जाते. आपण आपल्या इंटरनेट स्पीडची तपासणी bandwidthplace.com वर करू शकता. जर तुम्हाला तुमच्या इंटरनेट कनेक्शनच्या तपशीलाबद्दल खात्री नसेल तर कृपया आपल्या इंटरनेट कंपनीशी संपर्क साधा.

बऱ्यापैकी विंडोज सिस्टमवर, तुम्ही डेस्कटॉपवर कोठेही राईट-क्लिक करून, "properties" वर क्लिक करा, त्यानंतर डायलॉग बॉक्सच्या वरती असलेल्या "स्क्रीन सेव्हर" टॅबवर क्लिक करा. तेथून तुम्ही तुमचा स्क्रीनसेव्हर बंद करू शकता किंवा सेटिंग्ज बदलू शकता जेणेकरून एक तास तरी ते पुन्हा सुरु नाही होणार. बऱ्यापैकी मॅक सिस्टीममध्ये, अॅपल चिन्हावर जा आणि "सिस्टम प्रेफरन्स" वर क्लिक करा. "हार्डवेअर" मध्ये "एनर्जी सेव्हर" क्लिक करा. नंतर कॉम्पुटर आणि डिस्प्ले 1.5 तास किंवा त्यापेक्षा जास्त सेट करून बंद करा किंवा “नेव्हर” हा पर्याय निवडा

अभिप्राय