सद्गुरूंसोबत गुरुपौर्णिमा

वर्षातून एकदाच येणारा हा पवित्र सत्संग! गुरूच्या कृपावर्षावात न्हाहून आशीर्वाद प्राप्त करण्याची अलौकिक संधी.
23 जुलै 2021, सायं: 7 वाजता |ऑनलाईन
 

सद्गुरूंसोबत गुरुपौर्णिमा

वर्षातून एकदाच येणारा हा पवित्र सत्संग! गुरूच्या कृपावर्षावात न्हाहून आशीर्वाद प्राप्त करण्याची अलौकिक संधी.
23 जुलै 2021, सायं: 7 वाजता |ऑनलाईन
seperator
 

"गु म्हणजे अंधःकार, रू म्हणजे दूर करणारा. तुमचा अंधःकार जो दूर करतो तोच गुरू आहे." - सद्गुरू

गुरुपौर्णिमेचे महत्व  (Guru Purnima in Marathi)

उन्हाळा संपल्यानंतर येणार्‍या आषाढ महिन्यातील पहिल्या पौर्णिमेला (जुलै-ऑगस्ट दरम्यान) गुरु पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. या पवित्र दिवशी शिव - आदियोगी म्हणजे पहिला योगी यांनी पहिल्यांदा सप्तर्षीं – सात जगप्रसिद्ध ऋषी – जे त्यांचे पहिले शिष्य होते, त्यांच्यामध्ये योग विज्ञान संक्रमित केले. आणि या दिवशी आदियोगी, आदि गुरु अर्थात प्रथम गुरु बनले. सप्तर्षींनी या ज्ञानाचा जगभर प्रसार केला, आणि अगदी आजही, या पृथ्वीतलावरील प्रत्येक आध्यात्मिक प्रक्रियेमागे आदियोगींनी निर्माण केलेल्या अदभूत ज्ञानाची प्रेरणा आहे.

गुरु हा शब्द संकृत भाषेत “अंधकार दूर करणारा” या अर्थाने वापरला जातो. गुरु साधकाचे अज्ञान दूर करतो, आणि त्याच्या आत असलेला निर्मितीचा स्त्रोत अनुभवण्याची क्षमता निर्माण करतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पारंपरिकरित्या साधक त्यांच्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करतात. योग साधना आणि ध्यान यांचा अभ्यास करण्यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस विशेष फायदेशीर मानला जातो.

 

 

 
गुरू पौर्णिमा आपण कशी साजरी करू शकता?
seperator
नाद आराधना लाईव्ह
स. 11:40 - दु. 12:10

ध्यानलिंगाला केलेली नाद आराधना, अवश्य ऐका ऑनलाईन

लाईव्ह सद्गुरू सत्संग
सायं: 7 वाजता

या वर्षीच्या पवित्र सत्संगमध्ये अवश्य सहभागी व्हा आणि गुरुकृपेत न्हाहून घ्या

अन्नदानासाठी देणगी द्या

ईशा योग केंद्रातील संन्यासी, ब्रम्हचारी, आश्रम निवासी, आणि स्वयंसेवकांसाठी अन्नदान द्या