सद्गुरुंच्या 5 टिप्स - घरीच शरीर शुद्ध करण्यासाठी | 5 Tips to Naturally Cleanse Your Body at Home

 

पाण्याची काळजी तुम्हाला करायला हवी कारण ते ७२% आहे… ते फस्टक्लास आहे, माहितेय ना, उत्तीर्ण गुणांपेक्षा जास्त. पुढची गोष्ट आहे, अन्न, कारण ती पृथ्वी आहे- १२%, दुसरा मोठा भाग, हो ना? तर अन्न तुमच्या आत कस जात? कुणाच्या हाताने ते तुमच्याकडे येत, तुम्ही ते कस खाता, तुम्ही ते कस हाताळता, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत........ मग येतो तुमचा वायु, ६%, त्या ६ टक्यांमध्ये १ % किंवा त्याहीपेक्षा कमी भाग तुमच्या श्वासाचा आहे. बाकी खुप वेगेवेगळ्या पद्धतीने घडतय. आणी हे जास्त विशेषत: महत्वाच होत, जेव्हा तुम्हाला मुलं असतात. कमीत कमी महिन्यातुन एकदा, त्यांना बाहेर कुठेतरी न्या, सिनेमा बघायला नाही. परत दुसऱ्यांच सर्वकाही श्वसन करायला. वायुंवर आवाजांचा, उद्देशांचा, भावनांचा, सर्व कचरा जो पडाद्यावर चाललाय, आणी सर्व कचरा जो माणसांच्या मनात प्रतिबिंबीत होतोय, हिंसेबद्दल, कामाबद्दल, लोभाबद्दल, ह्याच्याबद्दल, त्याच्याबद्दल, या सगळ्याचा प्रभाव पडतो. ते त्या हॉलमधल्या सिमीत वायुला खुप मोठ्या प्रमाणात, प्रभावित करतो.....काही सुर्यप्रकाश तुमच्या शरीरावर दररोज पडु द्या, कारण सुर्यप्रकाश अजुनही शुद्ध आहे, हो ना? सुदैवाने कुणी त्याला दुषीत नाहि करु शकत. आणी कुठल्या प्रकारचा अग्नी तुमच्या आत प्रज्वलीत आहे, तो लालुचाचा अग्नी आहे का, द्वेषाचा अग्नी आहे का, संतापाचा अग्नी आहे का, रागाचा अग्नी आहे का? प्रेमाचा अग्नी आहे का? दयेचा अग्नी आहे का? कुठल्या प्रकारचा अग्नी तुमच्या आत प्रज्वलीत आहे? ह्याची काळजी तुम्ही घेऊ शकता. मग तुम्हाला तुमच्या शारीरिक आणी मानसिक कल्याण्याबद्दलची काळजी करण्याची गरज नाही, ते आपोआप ठीक होईल.

 
 
  0 Comments
 
 
Login / to join the conversation1