साधनापाद:साधनेतून स्व-परिवर्तन

ईशा योगा केंद्रात "साधनापाद" या स्व-परिवर्तनाच्या सात महिन्याच्या निवासी साधनेत भाग घेतलेल्या साधकांचा अनुभव आणि त्यांनी केलेल्या त्यांच्या आंतरिक यात्रेचे ओझरते दर्शन.
সাধনাপদ - সাধনার মাধ্যমে উত্থান
 

 

आध्यात्मिक उन्नतीचा काळ

आध्यात्मिक मार्गावर असलेल्या व्यक्तींसाठी उन्हाळा आणि हिवाळा या दरम्यानचा कालावधी अतिशय महत्वाचा आहे. यालाच साधनापाद, म्हणजे ग्रहणशीलतेचा उत्तम काळ म्हणून ओळखला जातो. योग परंपरेत आणि विशेषतः उत्तर गोलार्धात, हा कालावधी साधना करण्यासाठी अत्यंत अनुकूल समजला जातो, ज्या काळात आध्यात्मिकतेच्या दिशेने वाटचाल सहज नैसर्गिकरीत्या होते. या कालावधीत केलेल्या साधनेमुळे सर्वोत्तम परिणाम प्राप्त होतात.

सहज स्व-परिवर्तनाची सुसंधी

Sadhanapada – Rising Through Sadhana

या जगात पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी आवश्यक असणार्‍या अनेक गोष्टींपैकी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे समतोल आणि स्पष्टता. एक संतुलित जीवन जगण्यासाठी केवळ बाह्य कार्यकृतींच्या निवडीपेक्षाही बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव असतो. अंतर्मनात काय घडते आहे हे सुद्धा  तितकेच महत्वाचे आहे. साधनापाद हा एक असा कालावधी आहे, ज्यामध्ये प्रत्येकाला आपले मानसिक आणि भावनिक स्थैर्य प्रस्थापित करणे सहज शक्य होते, आणि असा एक आधारभूत पाया निर्माण करू शकतात की जेणेकरून आयुष्यातील कुठल्याही परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्यास सहायक ठरेल.

प्रखर साधनेचा काळ

Sadhanapada – Rising Through Sadhana

2018 मध्ये, पहिल्यांदा सद्गुरूंनी लोकांना साधनेचा कालावधी ईशा योग केंद्राच्या पवित्र वातावरणात घालविण्याची संधी उपलब्ध करून दिली. 21 देशांमधील 200 पेक्षा अधिक व्यक्तींनी यामध्ये सहभागी होऊन आंतरिक स्व-परिवर्तनावर विशेष लक्ष केन्द्रित करण्यासाठी उपलब्ध या संधीचा लाभ घेतला आहे.

Sadhanapada – Rising Through Sadhana

 

या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, साधक गंभीर, प्रखर साधना करतात, ज्यामध्ये दैनंदिन ध्यान-योग अभ्यास आणि स्वयंसेवा यांचा समावेश आहे. महाशिवरात्रीला या कार्यक्रमाची सांगता होईपर्यंत आपण या कार्यक्रमात सहभागी झालेल्या साधकांच्या प्रवासाचा पाठपुरावा करून त्यांना आलेले अनुभव आणि परिवर्तन याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

 

 
 
 
 
  0 Comments
 
 
Login / to join the conversation1