आपल्या प्रियजनांना शांतपणे मृत्यू येण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, आणि ज्या लोकांची त्यांना शांतपणे मृत्यू यावा अशी इच्छा असते, त्यांच्यासाठी भारतीय संस्कृतीत कोणत्या प्रक्रिया निर्माण करून ठेवल्या गेल्या आहेत याकडे सद्गुरु लक्ष वेधून घेतात.

प्रश्नकर्ता: माझी आई मृत्यूच्या समीप पोहोचली आहे. शांतपणे मृत्यू येण्यासाठी तिला तयार करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता?

सद्गुरु:  शांतपणे मृत्यू कसा येईल या विषयावर लोक जगभरात सर्वत्र बोलत असतात. ते फक्त त्यांना भीषण मृत्यू येऊ नये, आपल्याला शांत, यातनारहित मृत्यू यावा अशी त्यांची इच्छा आहे,  एवढंच त्यांना हवंय. हळुवारपणे त्यांना या जगाचा निरोप घ्यायचा आहे. मृत्युची भयभीतता घालवण्यासाठी तुम्ही एक सोपी गोष्ट करू शकता, ती म्हणजे एक दिवा लावा – तो तुपाचा असल्यास अधिक उत्तम, नाहीतर तुम्ही तेलाचा चालेल – दिवसाचे 24 तास सतत तो दिवा तुम्ही मृत्यूच्या समीप पोहोचलेल्या व्यक्तीच्या शेजारी सावकाश तेवत ठेवा. त्यामुळे एक तेजोवलय निर्माण होते आणि शरीर त्यागाची अवकळा काही प्रमाणात कमी करता येते. तुम्ही आणखी एक गोष्ट करू शकता ती म्हणजे ब्रम्हानंद स्वरूपा यासारखा एखादा धर्मनिरपेक्ष जप सीडीवर अगदी हळू आवाजात लावून ठेवा. या सरक्ष्य प्राणप्रतिष्ठित नादघोषाने देखील मृत्युची भीषणता निश्चितच कमी करता येईल.

एखाद्या  व्यक्तीच्या मृत नंतर किमान 14 दिवस हा दिवा आणि जप सुरू ठेवणे आवश्यक आहे, कारण ती व्यक्ती वैद्यकीयदृष्ट्या जरी मृत पावली असली, तरीसुद्धा ती संपूर्णपणे मृत पावलेली नसते. मृत्यू हळुवारपणे येतो. धरणीच्या या गोळ्यातून – म्हणजे शरीरातून प्राण बाहेर पडण्याची प्रक्रिया टप्प्या टप्प्याने घडत असते. खरे म्हणजे फुफ्फुसे, हृदय आणि मेंदूचे कार्य थांबलेले असते म्हणून त्या व्यक्तीला मृत घोषित केलेले असते, पण अद्याप तसे घडलेले नसते. अगदी मृत व्यक्तीच्या शरीराचे दहन केले, तरीसुद्धा ती व्यक्ती मृत नसते कारण तिचा पुढचा प्रवास अद्याप सुरू झालेला नसतो.

याच मुलभूत प्रक्रियेच्या आधारेच भारतात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर 14 दिवसांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे विधी करण्यात येतात. पण दुर्दैवाने, हे विधी करण्यामागचे विज्ञान आणि सामर्थ्य आपण हरवून बसलो आहोत आणि लोक केवळ त्यांच्या उपजीविकेसाठी हे विधी करत आहेत. याचे खरे महत्व अतिशय कमी लोकांना समजते. जेंव्हा एखादी व्यक्ती जाणीवपूर्वक मृत्यूचा त्वरित स्वीकार करते, तेंव्हा आपण काहीही करत नाही, पण इतर सर्व लोकांसाठी हे विधी पार पाडले जातात कारण तुम्हाला त्यांना पुढचा मार्ग दाखवायचा असतो.

म्हणूनच, एखादी व्यक्ती मरण पावते, तेंव्हा सर्वप्रथम केली जाणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या शरीरा संपर्कात असलेल्या सर्व गोष्टी, उदाहरणार्थ त्यांची अंतर्वस्त्रे, जाळून टाकली जातात. इतर कपडे, दागदागिने, सारे काही एकाच व्यक्तीला नाही –तर अनेक व्यक्तींमध्ये तीन दिवसात वाटून टाकले जाते. सर्व काही शक्य तितक्या तातडीने वाटून टाकले जाते ज्यामुळे ते गोंधळात पडतात. आपण आता कशाचा आधार घेऊन थांबून राहावे हे त्यांच्या लक्षात येत नाही. तुम्ही त्यांच्या वस्तु एकाच व्यक्तीकडे सोपवल्या, तर ते त्या व्यक्तीकडे जातील कारण त्यांच्या स्वतःच्या शरीरातील ऊर्जा त्यांच्या अंगवस्त्र, पोशाखात अद्यापही शिल्लक असते. या गोष्टी केवळ मृत व्यक्तीसाठीच केल्या जातात असे नाही, तर तिचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांचे सांत्वन करण्यासाठी सुद्धा केल्या जातात, ज्यामुळे ते त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूच्या घटनेचा स्वीकार करतात. एखाद्या व्यक्तीशी तुमचे कितीही घनिष्ठ संबंध असले किंवा तुम्ही त्यांच्या कितीही जवळचे असलात, तरीही जेंव्हा मृत्यू येतो, तेंव्हा सारा खेळ संपतो.

अगदी तुमचा शत्रू जरी आत्ता मरायला टेकला असेल, तरी त्याच्यासाठी तुम्ही शांत वातावरण निर्माण करायला हवे.

सामान्यतः, जगभर सर्वत्र, मग ती कोणतीही संस्कृती असो, असे सांगितले गेले आहे, “अगदी तुमचा शत्रू जरी आत्ता मरायला टेकला असेल, तरी त्याला शांतपणे मरण येण्यासाठी तुम्ही योग्य असे शांतीपूर्ण वातावरण निर्माण करायला हवे. तुम्ही कोणत्याही वाईट गोष्टी करू नका.” कदाचित युद्धात तुम्ही त्याला ठार मारले असेल, तेंव्हा मात्र तुम्ही त्याचा सन्मानाने निरोप घ्या, किंवा, “राम, राम” किंवा तुम्हाला जे माहिती असलेले शब्द उच्चारा. जेंव्हा एखादी व्यक्ती मरणाच्या समीप आलेली असते, त्या क्षणी सर्व वैर संपुष्टात आलेले असते. आता पुन्हा त्याच्यावर वार करण्यात काही अर्थ उरत नाही.

याच कारणास्तव, जेंव्हा मृत व्यक्तीला सुद्धा सन्मानाने वागवले जात नाही असे तुम्हाला दिसते, तेंव्हा तुम्हाला मनापासून वाईट वाटते. तुम्ही त्या मृतदेहाचा सन्मान राखला पाहिजे म्हणून नव्हे, तर तो हळूहळू निघून जात आहे म्हणून. तो कसा जगला याने काही फरक पडत नाही, शेवट मात्र योग्यरीत्याच झाला पाहिजे. प्रत्येक मनुष्याची किमान येवढी तरी इच्छा असावी.

Editor's note: Kayantha Sthanam is Isha’s Cremation Service ​that r​evive​s ancient traditions and death rituals with a powerful energy basis, conducting them in the spirit of service rather than as a commercial venture. ​We request your support and contributions to help us offer​ these services to more people. For more info, visit Kayantha Sthanam – Isha’s Cremation Services.

Use the links below for a free download of the Brahmananda Swarupa chant, as an mp3 or free mobile app.

Isha Chants – Free Mobile App
Vairagya - mp3 download